शिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर

banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला. 

Updated: Jun 12, 2022, 01:11 PM IST
शिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर title=

मुंबई : banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला. शिवरायांचा गनिमी कावा वापरुन छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे. तर काही वेळात हे बॅनर काढल्यात आले.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा न देता स्वत:चा उमेदवार उभा केला. मात्र, ही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. शिवसेनेच्या पराभवानंतर कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजे यांनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट केले होते. त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना भवनसमोरच समर्थकांनी बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचले आहे.  छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असा मजकूर या बॅनरवर आहे. त्यामुळे आता शिवसेना याला उत्तर देणार का, याचीही उत्सुकता आहे.