धक्कादायक, पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या

बोरिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच रुपयांसाठी हत्या करण्यात आली.

Updated: Feb 26, 2020, 10:56 PM IST
धक्कादायक, पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या
संग्रहित छाया

मुंबई : बोरिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी रामदुलार यादव मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोरीवली पूर्वेकडील मागाठणे पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपावर गेला. सीएनजी गॅस भरून झाल्यानंतर रामदुलार याने येथील कर्मचाऱ्याला गॅसचे पैसे दिले. पैसे करत करण्यावरुन भांडण झाले. या भांडणात मारहाण झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

रामदुलार याने पाच रुपये कमी दिल्याने ते मागितले. रामदुलार याने गॅस भरणाऱ्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. पैसे सुट्टे नसल्याचे कारण देऊन त्याने पाच रूपये परत करण्यास नकार दिला. यावरून रामदुलार आणि येथील कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. 

रामदुलार याला पेट्रोल पंपावर कर्माचाऱ्यांनी एकत्र येत मारहाण केली. चार ते पाच जणांनी मिळून रामदुलार याला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पेट्रोलपंपावरील पाच कर्मचाऱ्यांना अटक केली. रामदुलार हा नालासोपारा येथे कुटुबासोबत राहत होता.

0