गांजा आणि दारुचा कोरोनाशी संबंध काय?, सोशल मीडियावर अफवांचं पीक

 कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अफवांचं पीक 

Updated: Jan 21, 2021, 09:26 PM IST
गांजा आणि दारुचा कोरोनाशी संबंध काय?, सोशल मीडियावर अफवांचं पीक title=

मुंबई : कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. गांजा हा कोरोनावर गुणकारी असल्याचा मॅसेज कॅनडातल्या एका विद्यापीठाच्या हवाल्यानं फिरतोय. तर दुसरीकडं कोरोनाची लस घेण्यापूर्णी आणि नंतर दारु पिऊ नये असे मॅसेज फॉरवर्ड होतायत. याबाबत काय फॅक्ट आहे त्यावर हा स्पेशल रिपोर्ट.

गांजामुळं कोरोनाविरोधातली प्रतिकारक क्षमता वाढते?

गेल्या वर्षभरापासून जग कोरोनाशी लढा देतंय. कोरोनाचा विषाणू मानवी शरीरावर गंभीर परिणाम करतो. त्यामुळं कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळं संशोधन सुरू आहे. कॅनडाच्या लेथब्रिज विद्यापीठातील एका संशोधकांच्या गटानं पोस्ट कोरोना साईड इफेक्ट रोखण्यासाठी गांजा उपयुक्त असल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर हा मॅसेज वाऱ्यासारखा व्हायरल झाला. तज्ज्ञांनी मात्र याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

लसीकरणापूर्वी आणि नंतर दारू प्यावी का?

दुसरीकडं लसीकरणापूर्वी दोन महिने आणि लसीकरणानंतर दारु पिऊ नये असे मॅसेज व्हॉट्सऍपवर फिरु लागले आहेत. खरं तर दारु ही शरिरासाठी हानीकारक आहे. कोणत्याही आजारावरचं औषध घेताना दारुचं सेवन टाळावंच असं तज्ज्ञ सांगतात. कोरोनाच्या लसीबाबत अशा कोणत्याच गाईडलाईन्स नाहीत. तरीही तज्ज्ञ मद्य सेवनाबाबत काही सल्ला देत आहेत.

नशा करणं हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळं नशा कोरोनावर उतारा होऊच शकत नाही. त्यामुळे दारू काय आणि गांजा काय....कोरोनाशी लढायचं असेल तर आरोग्य विभागानं जारी केलेल्या गाईडलाईन्सचं पालन करण गरजेचं असून खबरदारी हाच उपाय आहे.