देशाच्या अर्थव्यवस्थेचा 'बॅण्ड' वाजला, मोदी सरकारवर शिवसेनेचा निशाणा

उद्योगपती राजीव बजाज आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या चर्चेत जे समोर आले आहे ते अत्यंत भयंकर आहे.  

Updated: Jun 6, 2020, 08:01 AM IST
देशाच्या अर्थव्यवस्थेचा 'बॅण्ड' वाजला, मोदी सरकारवर शिवसेनेचा निशाणा title=

मुंबई : उद्योगपती राजीव बजाज आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या चर्चेत जे समोर आले आहे ते अत्यंत भयंकर आहे. लॉकडाऊनंतरच्या अर्थव्यवस्थेबाबत भयंकर चेहरा समोर आला आहे. मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीन लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तर रोखला गेला नाहीच, मात्र, अर्थव्यवस्था मात्र साफ उद्ध्वस्त झाली आहे, असा हल्लाबोल करत शिवसेनेने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'सामना'च्या संपादकीयमध्ये अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा  'बॅण्ड' कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले आहे. राजीव बजाज यांचे वडील राहुल बजाज हे तोंडफाट सत्य बोलण्यात प्रख्यात आहेत. चमचेगिरीशी त्यांचा कधी संबंध आल्याची नोंद नाही. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले याचे महत्व अधोरेखित होते, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्याचवेळी कोणी चमचेगिरी केली, यालाही उत्तर दिले आहे.

मोठ्या वादळानंतर पडझीच्या अंदाज घेतला जातो. पंचनामे वगैरे केले जातात. तसे पंचनामे आता लॉकडाऊननंतरच्या पडझडीबाबत केले जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  'पुन:श्च हरिओम'चा नारा दिला आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यात निर्बंध शिथिल झाले आहेत. पण ७२ दिवसांच्या लॉकडाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरु केला आहे. लॉकडाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनीही तेच सांगितले. आता राहुल गांधी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी जी खुली चर्चा झाली. अर्थव्यवस्थेबाबत भयंकर चेहरा समोर आला आहे. मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीन लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तर रोखला गेला नाहीच, मात्र, अर्थव्यवस्था मात्र साफ उद्ध्वस्त झाली आहे, सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

राजीव बजाज यांनी काहीच नवे सांगितले नाही. देशातील अनेक उद्योजक, व्यापारी आणि नोकरदारवर्गास नेमके हेच सांगायचे होते. पण अनामिक भीतीने त्यांनी गप्प राहणे पंसत केले आहे. राजीव बजाज यांनी त्यांचे मत परखडपणे मांडले आहे. बजाज यांनी लॉकडाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांना  'ट्रोल' केले जाईल, देशविरोधी ठरवले जाईल, पण स्वातंत्र्यपूर् काळातील बजाज कुटुंबाचे योगदान आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेस ताकद देण्याची त्यांची धडपड देशाला माहीत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

केंद्र सरकारने २० लाख कोटीचे पॅकेज दिले, पण निसर्ग वादळाप्रमाणे ते पॅकेज घोंघावत आले आणि गेले. बजाज यांनी नेमके हेच सांगितले आहे. लोकांना थेट मदत करा, असे राहुल गांधी, रघुराम राजन आणि राजीव बजाज सांगितले आहे. पण नियोजन आणि दिशा नाही. हे नियोजन आता पश्चिम बंगाल आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकांत दिसून येईल. अर्थव्यवस्थेला दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे, असा चिमटा शिवसेनेने भाजपला काढला आहे. गुजरात राज्यसभा निवडणुकीत धक्का द्यायचाच म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचे आणि यासाठी जये नियोजन केले जाते तसे काटेकोर नियोज टाळेबंदीबाबतही करणे गरजेचे होते, असा सल्लाही दिला आहे.