मुंबई : मुंबईत क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) युनिट 12 ची मोठी कारवाई करण्यात आली आहे . मुंबईत सध्या कोरोना उपचारासाठी मोठा प्रमाणात रेमडीसीवीर (Remdesivir) इंजेक्शनची मागणी होत आहे. या गरजेचा फायदा घेऊन काहीजण रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. मुंबईत क्राईम ब्रँच युनिट 12 ने गोरेगाव पश्चिमेत मोतीलाल नगर मधील लिंक रोडजवळ असलेला एका हॉटेलच्या किचनमध्ये छापा मारला. या ठिकाणाहून तब्बल 34 रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
या छापा कारवाईमध्ये क्राईम ब्रँच युनिट 12 ने पाच आरोपींना अटक केली. या आरोपींनी गुजरात राज्यातून रेमडीसीवीर इंजेक्शन मुंबईला आणले. त्यानंतर हे इंजेक्शन 18 हजार रुपयांपासून 25 हजारांमध्ये विकत होते.
गेल्या आठवड्यात एफडीने देखील अशाप्रकार मोठी कारवाई केली. अंधेरीतल्या मरोळमध्ये रेमडेसिवीरचा साठा (Remedisivir injection Stock) जप्त करण्यात आलाय. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या दोन हजार बॉटल्सचा साठा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत हा साठा जप्त करण्यात आलाय. तसेच 200 रेमडेसिवीर इंजेक्शन मरिन लाईन्समधूनही ताब्यात घेण्यात आली आहेत. अशा एकूण 2200 बॉटल ताब्यात घेण्यात आल्या.
नाशिक जिल्ह्यात रेमडेसिवीर (Ramdesivir) इंजेक्शनचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केला. रेमडीसीवीर निश्चित सूत्रानुसार वितरित करावे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
धुळे आणि अहमदनगर जिल्ह्याकरिता देण्यात येणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे हा साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी सुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो, अशी बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे.