मुंबई: सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा सनातनशी कोणताही संबंध नाही. तरी आम्ही त्यांना कायदेशीर बचाव करण्यास मदत करु, असे सनातनचे वकील संजीव पुनाळकर यांनी सांगितले. शरद कळसकर आणि संजीव पुनाळकर हे सनातनचे साधक नाही. मात्र, हिंदू संघटनांसाठी काम करणाऱ्या वकिलांकडून या दोघांना मदत केली जाईल. या दोघांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिल्याचा एटीएस आणि सीबीआयचा दावा खोटा आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा आधार घेऊन निरपराध तरुणांना पकडायचे आणि त्यांच्याकडे पिस्तुलं मिळाल्याचे दाखवायची, ही सीबीआयची कार्यपद्धती असल्याचा दावा पुनाळकर यांनी केला.
सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. २० ऑगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. अवैध शस्त्रसाठाप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीची देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबुली चौकशी दरम्यान मिळाली आहे.