मुंबई : पेट्रोलच्या दरावरून मनसे आणि भाजप सरकार आमनेसामने आलीय. पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसाला सवलतीच्या दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्याचं अभियान मनसे १४ जूनला राबवणार आहे. मात्र, काही पेट्रोलपंप चालकांनी हे अभियान राबवण्यास नकार दिलाय.
भाजपच्या दबावामुळे हा नकार दिल्याचा आरोप मनसेनं केलाय. मात्र या चालकांनी अधिकृत भूमिका जाहीर करावी अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर देणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भाजप सरकारला इशारा देणारं ट्विटही केलंय.
हिंदुस्थान पेट्रोलियम चे अधिकारी अनधिकृत रित्या मनसे चा 14जून चा कार्यक्रम होऊ नये म्हणून पेट्रोलपंप डीलर्स वर दबाव आणत आहेत माझी विनंती आहे त्यांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये अन्यथा गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 12, 2018
१४ जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसेकडून मुंबईतील पेट्रोल पंपावर ४ रुपये सवलतीच्या दरात दुचाकी चालकांना पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे अभियान राबवलं जाणार आहे.