मुंबई : राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे.
राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ८ मार्च महिला दिनापासून या योजनेची सुरवात होईल. या योजनेला अस्मिता - माझा गौरव, माझा हक्क असं नाव देण्यात आलं.
या योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.