मोठी बातमी! मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी, हेमंत नगराळे यांची झाली बदली

Updated: Feb 28, 2022, 04:42 PM IST
मोठी बातमी! मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी title=

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी (mumbai police commissioner) संजय पांडे (Sanjay Pande) यांची वर्णी लागली आहे. आधीचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hement Nagrale) यांची बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी संजय पांडे आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळलतील.

संजय पांडे हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते, पण त्यांच्या नियुक्तीला विरोध झाल्यानंतर रजनशी सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती करण्यात आली. 

संजय पांडे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय पांडे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर संजय पांडे यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली. 

दुसरीकडे हेमंद नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते नाराज होते, त्यामुळे त्यांची साईड पोस्टिंग दिल्याची चर्चा आहे. 

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांना हटवून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना आणण्यात आलं. पण कालावधी पूर्ण होण्याआधीच हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे.