Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. 

Updated: Mar 1, 2023, 03:43 PM IST
Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान title=
Sanjay Raut

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.  संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याची तयारी भाजप करत आहे, अशी माहिती आहे. शिंदे गट आणि भाजपचे आमदार राऊतांवर कमालीचे आक्रमक झालेत. विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे धक्कादायक विधान संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलं. (Sanjay Raut Controversial Statement) संसदेतलं गटनेतेपद काढलं तरी हरकत नाही, शिंदे गट चोरमंडळ, विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार गदारोळ झाल्यावर राऊत यांनी यू टर्न घेतला आहे. 

भाजपकडून हक्कभंग सूचना

संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) हक्कभंग सूचना मांडली. ( Privilege Notice)  त्यावर सभागृहाची भावना ऐकून घेऊन अध्यक्षांनी (Vidhansabha Speaker Rahul Narvekar) हक्कभंगावर दोन दिवसांत सखोल चौकशी करुन 8 मार्चला निर्णय देणार असल्याचं म्हटले आहे. तर अटकेचा निर्णय उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadanvis) घेतील असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी म्हटले आहे. Sanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान, भावावरही कारवाई?

विधानसभेत जोरदार पडसाद 

दरम्यान, संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहीजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. संजय राऊतांच्या विधिमंडळ नव्हे चोरमंडळ या वक्तव्याचं त्यांचा भाऊ सुनील राऊतांनी समर्थन केलंय. तर संजय राऊतांसह त्यांच्या भावावरही कारवाई करा अशी मागणी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी केली आहे. 

संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत याची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करुन दिली. तर अजित पवारांनीही शाहनिशा करून कारवाई करावी असं म्हटलंय. काँग्रेसनेही राऊतांच्या विधानावर असहमती दर्शवली आहे.

'संजय राऊतांना तात्काळ अटक करा'

 संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. संजय राऊतांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी विधानपरिषदेत केली. राऊतांच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले.. या वादामुळे परिषदेचं कामकाज 15 मिनिटांसाठीही तहकूब करण्यात आलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या संजय शिरसाठ आणि गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. 'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम' झाला आहे, असे शिवसेनेच्या संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. तर 'संजय राऊतांनी राजीनामा द्यावा' मग जनतेतून जिंकून यावं, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.