Sanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान, भावावरही कारवाई?

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी धक्कादायक विधान केले. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी  कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करु असे ते म्हणाले. 

Updated: Mar 1, 2023, 12:38 PM IST
Sanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान, भावावरही कारवाई? title=

Sanjay Raut Controversial Statement : विधीमंडळ हे 'चोर'मंडळ आहे, असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापुरात केले. यानंतर राज्यात मोठे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, संसदेतले गटनेतेपद काढलं तरी हरकत नाही, शिंदे गट चोरमंडळ, विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असे राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांच्या विधिमंडळ नव्हे  'चोर'मंडळ या वक्तव्याचं त्यांचा भाऊ सुनील राऊत यांनी समर्थन केले आहे. आता संजय राऊत यांच्यासह त्यांच्या भावावरही कारवाई करा, अशी मागणी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी केली आहे. 

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच वादग्रस्त विधान

विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे, असे राऊत म्हणाले. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, लोकांची गर्जना काय आहे काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने आमदार बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना. ही गर्जना पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात जात आहोत, असे संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे म्हटले आहे. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करु असे ते म्हणाले. 

राऊत यांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

'आयएनएस विक्रांत' वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट  सोमया यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले. त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत: विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहोत, मी स्वत: न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं, असे राऊत म्हणाले. 

2024 ला जनता सर्व हिशोब करेल...

सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली.  पण दुसरीकडे जो जाब विचारतो,  त्याला तुरुंगात टाकायचं खोटे गुन्हे दाखल करायचे बदनाम करायचं, असे षडयंत्र रचला जात आहे , पण जनता  2024 ला याचा सर्व हिशोब करेल, असा इशारा राऊत यांनी दिला. 

कोव्हिड काळात  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा आणि यंत्रणा उत्तमरित्या चालवली गेली.  त्यासंदर्भात इक्बालसिंह चहल यांनी स्वतः सांगितलं. कोव्हिड डं संदर्भात गुन्हा दाखल करायचे असेल तर योगी आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यादा गुन्हा दाखल करावा. अनेक प्रेत गंगेतून वाहून  गेली,  सगळ्यात पहिला 307 चा गुन्हा सरकारने योगी सरकारवर दाखल गेला पाहिजे, असे राऊत म्हणाले. 

यावेळी त्यांनी पुणे पोटनिवडणुकीवर भाष्य केले. कसबा निवडणूक आपण हरतो आहोत हे जेव्हा भाजपला कळलं, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. हाताशी  यंत्रणेचा वापर करुन तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल, असे राऊत म्हणाले.