एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  

Updated: Jul 1, 2022, 01:05 PM IST
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला title=

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंच्या नावाची घोषणा फडणवीस यांनी केल्यानंतर शिंदेंनी फडणवीसांचं मन मोठं असल्याचं म्हटलं होतं. त्यावर राऊतांनी टोला लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवलं असतं तर आज युती टिकली असती. या मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसतेय, असे म्हणत राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत ईडी चौकशीसाठी हजर

आधीच सत्तासंघर्षामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतही आता ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण राऊत  यांची यापूर्वी ईडीसमोर  चौकशी झाली आहे. प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. मंगळवारी 28 जून रोजी  निर्देश देण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या वकीलांनी 14 दिवसाची मुदत मागितली होती मात्र ईडीने  1जुलै तारखेला बोलावले त्यानुसार आज चौकशीसाठी आले. एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती.