मुंबई : सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'वीर सावरकर हे खरे भारत रत्न! पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी. इंग्रज सरकारने सावरकरांची पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे, विद्यापीठ असावे. केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. याबाबतचं एक ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
वीर सावरकर हे खरे भारत रत्न!पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी.इंग्रज सरकारने सावरकरांची पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे. विद्यापीठ असावे.केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे.
वीर सावरकरांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/8834fqQPaC— Sanjay Raut (@rautsanjay61) May 28, 2020
त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/Q881EjQobX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2020
नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली होती. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून हिवाळी अधिवेशनात भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला होता. सावरकरांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी भाजपने केली होती. उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला प्रस्ताव दिल्यानंतरही सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल अजित पवारांनी अधिवेशनात भाजपला विचारला होता.