शासकीय कार्यालयांवर भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले....

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा स्वाभिमानाचा, स्वातंत्र्यांचा आहे, ज्या दिवसाने आम्हाला प्रेरणा दिली स्वातंत्र्यांची स्वाभिमानाची, पहिलं 

Updated: Jun 6, 2021, 02:01 PM IST
शासकीय कार्यालयांवर भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले.... title=

मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा स्वाभिमानाचा, स्वातंत्र्यांचा आहे, ज्या दिवसाने आम्हाला प्रेरणा दिली स्वातंत्र्यांची स्वाभिमानाची, पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची, आणि याला विरोध करणारे नतदृष्ट कोण आहेत, अशा घुबडांची सरकारने काळजी न करता, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, भगवा फडकण्याचा विरोध करणाऱ्या घुबडांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा फडकवण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं म्हटलं होतं, या प्रश्नाला उत्तर देतांना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा निर्माण होण्यामागे भगवा देखील आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली.

भगवा झेंडा हा महाराष्ट्राच्या सरकारी कार्यालयांवर फडकणे, हा आपला स्वाभिमान आहे, आपलं स्वप्न आहे, तसेच तिरंग्याचा हा अपमान जर कुणी म्हणत असेल तर अजिबात अपमान नाही. तसेच ज्याला भगव्याचं महत्त्व कळत नसेल, आणि महाराष्ट्राच्या मातीचं महत्त्व समजत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.