जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

चित्रपटसृष्टीच नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेची देखील बदनामी होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.   

Updated: Sep 15, 2020, 05:31 PM IST
जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. मंगळवारी राज्यसभेमध्ये शून्य प्रहराच्या तासाला बॉलिवूडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आहे. काही ठराविक लोकांच्या अपप्रचारामुळे फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर संस्कृती आणि परंपरेची देखील बदनामी होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 

एएनआयशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'काही ठाराविक लोकं बॉलिवूडबद्दल वाईट बोलत आहेत. त्यामुळे फक्त चित्रपटसृष्टीचीच बदनामी होत नसून आपल्या संस्कृती आणि परंपरेची देखील बदनामी होत असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केली. 

शिवाय, लोकांच्या मते याठिकाणी ड्रग्स रॅकेट चालतं.  हा फक्त राजकीय किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा भाग नाही? हे थांबवण्याची जबाबदारी सरकार आणि  जनतेची देखील आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

दरम्यान, कलाविश्नाशी संलग्न व्यक्तींना सोशल मीडियावर फटकारलं जात आहे. या वर्तुळात नावारुपास आलेली लोकंच कलाविश्वाला गटार म्हणत आहेत. मी याच्याशी मुळीच सहमत नाही. मी आशा करते की सरकारडून अशा व्यक्तींना या शब्दांचा वापर न करण्याबाबतची ताकीद देण्यात येईल' असं समाजवादी पक्षाच्या जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.