'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत...,'

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.   

Updated: Oct 29, 2019, 01:41 PM IST
'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत...,' title=

मुंबई : राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत देऊन सरकार स्थापनेची संधी दिली आहे. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात अडकले आहेत. अजूनही सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली होता दिसत नाही. शिवसेनेने ५०-५० चा फॉर्म्युला सांगत सत्तेत निम्मा वाटा मागितला आहे. त्यामुळे शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, तर भाजप त्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. भाजप सेनेच्या आमदाराला फोडण्याबाबत बोलत असताना, शिवसेनाही इतर पर्यायांचा प्रयत्न करण्याचा दावा करत आहे.

आम्ही पाप करु इच्छित नाही!

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, 'आमच्याकडे पर्याय आहेत. परंतु अन्य पर्याय वापरून पाप करू इच्छित नाही. शिवसेनेला सत्तेची भूक नाही. या प्रकारच्या राजकारणापासून शिवसेनेने नेहमीच स्वत: ला दूर ठेवले आहे. 'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत, आम्ही धोरण, धर्म आणि सत्याचे राजकारण करतो. काँग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नाही.

मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नाही - सीएम

शिवसेनेचे नेते म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण इतके गुंतागुंतीचे झाले आहे. आम्हाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर हा आपला सन्मान आहे. लवकरच काही निर्णय घेण्यात येईल. आम्ही बाजार उघडून बसलेले नाही.  आम्ही पहात आहोत, लोक फक्त किती खालच्या थराला जाऊ शकतात ते. आमची एवढीच मागणी आहे की, जे आधी ठरले आहे, त्याबाबत चर्चा करुन पुढे जायला हवे. आम्ही केलेल्या करारावर पुढील चर्चा करू.

'माझ्यामुळे भाजप नेतृत्व नाराज, ही अफवा'

भाजपचे ५५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं आम्ही म्हणालो तर ते काय म्हणतील. संजय काकडे काय बोलतात ते विसरून जायला हवं. काकडेंना भाजपने अधिकृत नेमलं आहे का ? फुटणाऱ्यांच्या नशिबी काय येतंय, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा दावा कसा मानायचा. मी म्हटले भाजपचे ४५ आमदार आमच्या संपर्कात आहे तर? आम्ही सत्ता स्थापनेसाठी स्वतंत्र प्रयत्न नाही करणार, युती आहे. दोन्ही पक्षांचा युतीधर्म आम्ही पाळतो. युतीत चर्चा झाली नाही हे खरंय, पण ती होईल. 

दोन्ही पक्ष एकत्र असताना बार्गेनिंग पॉवरचा प्रश्न येतो कोठे? निवडणुकीपूर्वी जे ठरलंय त्याची सत्ता स्थापनेत अंमलबजावणी करायची. हीच आमची मागणी आहे, वेगळं काय मागतोय आम्ही. विरोधी पक्षात बसायचं असेल तर आम्ही भाजप शिवसेना दोघेही बसू. आम्ही इशारे देत बसत नाही, उलच फार न ताणता सरकार बनायला हवं, अशी आमची भूमिका आहे दरम्यान, माझ्यामुळे भाजप नेतृत्व नाराज आहे, ही एक अफवा आहे, असे संजय राऊत म्हणालेत.