मुंबई : Varsha Raut is being inquiry by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज वर्षा राऊतांची ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमाराला वर्षा राऊत या ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
राऊत दाम्पत्याची समोरा समोर चौकशीची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि सुनील राऊतही आहेत. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर वर्षा राऊतांना ईडीनं समन्स बजावलं होतं. आज त्यांची चौकशी होत आहे.
राऊत यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
पत्राचाळ प्रकरण, अलिबागमधील जमिनीचे व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.