Rain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी

Rain News​ : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Updated: Aug 6, 2022, 08:39 AM IST
Rain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी  title=
संग्रहित छाया

मुंबई : Rain News : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार हा पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊस झाला आहे. तर कोकणात गेले तीन दिवस पाऊस कोसळत आहे. दरम्यान, 9 ऑगस्टपर्यंत भारती हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. (IMD Weather Forecast  Rainfall Alert)

राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

दरम्यान उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रीय झालाय. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल. 

हवामान खात्याने (IMD) पुढील 24 तासांत देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्याचवेळी ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडी भुवनेश्वरचे संचालक एचआर बिस्वास यांच्या मते, भुवनेश्वर शहरात आज मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशमध्ये आज अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.