...तर एसबीआय एटीएम कार्ड कायमचे बंद होईल!

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 16, 2018, 05:34 PM IST
...तर एसबीआय  एटीएम कार्ड कायमचे बंद होईल! title=

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. एसबीआयने सर्व डेबिट कार्ड धारकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. जर तुम्ही ही सूचना अंमलात आणली नाही तर तुमचे कार्ड कायमचे बंद होईल.

एसबीआयच्या सगळ्या ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड बदलून  घेणे गरजेचे आहे. ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम) कार्ड घ्यावे, असे आवाहन एसबीआयकडून करण्यात आले आहे. 

एसबीआयने ट्विटर हॅंडलवरुन आणि वेबसाइटवर याबबात माहिती दिली आहे. यामध्ये मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड ३१ डिसेंबरनंतर ब्लॉक केले जाणार आहे. त्याऐवजी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम) कार्ड दिले जाणार आहे. आरबीआयच्या आदेशानुसार हा बदल केला जात असल्याचंही एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणांमुळे तुमचे कार्ड ब्लॉक केले जाईल, असा इशारा एसबीआयने दिला आहे.

एटीएम कार्ड बदलण्यासाठी ग्राहक ऑनलाइन अर्ज करु शकतात अथवा बॅंकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही कार्ड बदलण्यासाठी अर्ज करु शकतात. कार्ड बदलण्यासाठी एसबीआयकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एकदा कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ते कार्ड पुन्हा अनब्लॉक करता येणार नाही. त्यामुळे जुने कार्ड बदलणे क्रमप्राप्त आहे.