नशीब म्हणतात ते हेच का? भर रस्त्यावर अपघात घडला, पण तरुण मात्र सुखरुप... पाहा व्हिडीओ

2 सेकंद देखील आयुष्यात किती महत्वाची असतात, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.... पाहा धक्कादायक व्हिडीओ  

Updated: Jul 18, 2022, 04:37 PM IST
नशीब म्हणतात ते हेच का? भर रस्त्यावर अपघात घडला, पण तरुण मात्र सुखरुप... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच काहीसं एका तरुणाच्या बाबतीत घडलं आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. यामध्ये अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वाहानं जपून चालवण्याचं आवाहन केलं जातं. 

प्रत्येक सेकंद आयुष्यात किती महत्त्वाचा असतो हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मृत्यूच्या दाढेतून परत येतो. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावतो. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अचानक दुचाकी महामार्गावर घसरते. ही दुचाकी पावसामुळे रस्त्यावरून स्लीप झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुण खाली कोसळतो त्याच वेळी मागून एक भलामोठा ट्रक येत असतो. 

तरुण झटकन उठून पलिकडे जीव मुठीत घेऊन धावत जातो. हा व्हिडीओ पाहताना वाटते की आता या तरुणाची आणि ट्रकची धडक होईल पण दोन सेकंदात तरुण आपला जीव वाचवतो. 

तरुण सुखरुप असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्यक्तीला लकी देखील काही लोकांनी म्हटलं आहे. तर काही लोकांनी हा व्हिडीओ खूप थरारक असल्याचं म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.