मुंबई : धारावीतील नागरिकांची तपासणी करण्याला आणखी वेग येणार आहे. आता ठिकठिकाणी डॉक्टरांमार्फत स्क्रिनिंगचे करण्यात येत आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ही तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप असलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
BreakingNews । मुंबई धारावीतील नागरिकांची तपासणीला आणखी वेग । सर्दी, ताप असलेल्या नागरिकांची डॉक्टरांमार्फत होणार स्क्रीनिंग #coronavirus #COVID19 #CoronaVirusUpdates @CMOMaharashtra @OfficeofUT@rajeshtope11@OfficeofUT @ashish_jadhao@AnilDeshmukhNCP@AjitPawarSpeaks
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 7, 2020
मुंबईतील आर्थर रोड जेलमधल्या एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर जेलमधील १५० कैदी आणि सुरक्षापथकांतील काही जणांची चाचणी करण्यात आलीय. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाकडून ही तपासणी करण्यात येतं. एका ५० वर्षांच्या कैद्याला कोरोना झाल्याचं लक्षात आल्यानंतर ही खबरदारी घेण्यात येतेय. कारागृहाची क्षमता ८०० असली तरी सध्या कारागृहात २५०० कैदी आहेत.
दरम्यान, कोरोनाचा धोका असल्याने लॉकडाऊन शिथिल केले होते. मात्र, गर्दी होऊ लागल्याने पालिकेना आपला लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने मागे घेतला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं बंद राहतील. त्यामुळे अन्नधान्य आणि औषधांची दुकाने सुरु राहतील. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आल्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
नेहमी पर्यटक किंवा मुंबईकरांनी गजबजलेला जुहू समुद्र किनारा सध्या एकदम शांत शांत आहे. लॉकडाऊनमुळे वर्दळ कमी झाली आणि इथं कायम असणारा कचराही नाहीसा झाला. त्यामुळे जुहू बीचचं सौंदर्य अधिकच खुलले आहे.