Seat Belts Mandatory : वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई

तुमच्या कारमध्ये सीटबेल्ट आहे ना? नसेल तर आताच बसवून घ्या.... कारण शिक्षा परवडणारी नाही. 

Updated: Nov 1, 2022, 09:52 AM IST
Seat Belts Mandatory : वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई  title=
Seat Belts compulsory for all seating in four wheeler in mumbai

Seat Belts Mandatory : कारने प्रवास करण्यासारखी सुखसोय नाही असं बरेचजण म्हणतात. हल्ली कार ही एक Luxury राहिली नसून अनेकांच्या आयुष्यात ती दैनंदिन गरजांपैकी एक झाली आहे. पण, याच कारमध्ये सीटबेल्ट नसल्यास आता तुम्हाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे. (Mumbai traffic rules)

कारने प्रवास करताय? सीटबेल्ट लावा...कारण, आजपासून मुंबईत (Mumbai) चारचाकीमध्ये मागील आसनांवर असणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. सीटबेल्ट (seat belt) न लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

ही दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून होणार आहे. कारण दरम्यानच्या काळात ज्यांच्या कारमध्ये सीटबेल्ट नाहीत त्यांना तो बसवून घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. सध्या सीटबेल्ट असूनही तो न वापरणाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत (November) समज दिली जाणार आहे. तर, सीटबेल्ट नसलेल्यांना एक महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. 

अधिक वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय

 

(Vehicle Rule) केंद्रीय मोटार वाहन नियम 125 (1) अन्वये आठ प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांमध्ये Front Facing प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. पण, मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) अंतर्गत वाहन चालकासह प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करावा. सीट बेल्ट न वापरल्यास वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

... तर प्रवाशांवर होणार कारवाई 
मुंबई वाहतूक पोलीस शाखेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात यसंदर्भातील एक मोठी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार प्रवासी वाहन किंवा टॅक्समधीमध्ये सीटबेल्टची व्यवस्था असूनही प्रवाशांकडून त्याचा वापर होत नसल्यास अशा प्रसंगी चालकाऐवजी वाहनातील प्रवाशांवर ई चलान (E Challan) कारवाई केली जाणार आहे. 

कारवाईमध्ये प्रवाशांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक या साऱ्याची नोंद केली जाणार आहे. तर, कारवाईदरम्यान दंडाची रक्कम प्रवाशांकडून जागच्या जागीच वसूल करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.