Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं

महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आता जोरदार आक्षेप घेतलाय.   

Updated: Oct 31, 2022, 11:59 PM IST
Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं

मुंबई : राज्यातील उद्योग प्रकल्प गुजरातला (Gujrat) चालल्यानं महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकारण चांगलंच तापलंय. यानिमित्तानं महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Maharashtra Government) चांगलंच धारेवर धरलंय.  विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Mns Raj Thakceray) यानिमित्तानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच (Narendra Modi) सुनावलंय.  (mns chief raj thackeray critisized to pm narendra modi over to tata air bus project move to gujrat)

प्रकल्पांच्या वादात राज ठाकरेंची उडी 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे अशी नवी महायुती आकाराला येतेय. मात्र महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही आता जोरदार आक्षेप घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला झुकतं माप देत असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. विशेष म्हणजे राज ठाकरेंनीही यानिमित्तानं थेट मोदींनाच लक्ष घालण्याचं आवाहन केलंय.

राज ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झालीय. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आणि पंतप्रधान मोदींची बाजू सावरून घेताना, उपमुख्यमंत्री फडणवीसांना राजकीय कसरत करावी लागली.

परप्रांतियांच्या लोंढ्यांविरोधातील राज ठाकरेंची भूमिका जगजाहीर आहे. महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी सध्या जहाल हिंदुत्वाची वाट धरलीय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाशी मनसेचे सूर जुळू लागलेत. मात्र महाराष्ट्रातले उद्योग प्रकल्प गुजरातला चालल्यानं पुन्हा एकदा राज ठाकरेंची मराठी अस्मिता जागी झालीय. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महायुतीच्या नवनिर्माणात ही भूमिका अडचणीची तर ठरणार नाही ना, याचीच चर्चा सुरू झालीय.