अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांना सेबीने ठोठावला इतका दंड, काय आहे कारण...

आता सेबीनेही (SEBI) पोर्नोग्राफिक फिल्म बनविल्याचा आरोप असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा  (Raj Kundra) याच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. 

Updated: Jul 29, 2021, 07:06 AM IST
अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांना सेबीने ठोठावला इतका दंड, काय आहे कारण...

मुंबई : आता सेबीनेही (SEBI) पोर्नोग्राफिक फिल्म बनविल्याचा आरोप असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा  (Raj Kundra) याच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. सेबीने राज कुंद्रा, त्यांची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि कुंद्रा याच्या विवान इंडस्ट्रीजवर तीन लाखांचा दंड ठोठावला आहे.

माहिती देण्यात उशीर केल्याचा आरोप  

सूत्रांच्या माहितीनुसार सेबीने (SEBI) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Raj Kundra)यांच्यावर प्रिवेंशन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग नियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याच्यावर प्रिफरेंशयल अलॉटमेंटबाबत माहिती देण्यात उशीर झाल्याचा आरोप  ठेवण्यात आला आहे. दंड जमा करण्यासाठी या दोघांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

व्यवहाराचा तपशील वेळेवर दिलेला नाही

मिळालेल्या माहितीनुसार 2.57 कोटी रुपयांच्या समभागांचे प्राधान्य वाटप 2015 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी तेथे दहा लाखाहून अधिक किंमतीचे शेअर्स होते, म्हणून खुलासा होणे आवश्यक होते. नियमांनुसार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांना व्यवहारानंतर दोन ट्रेडिंग दिवसात खुलासा करणे आवश्यक होते. परंतु मे 2019 मध्ये हा खुलासा करण्यात आला.

पॉर्नोग्राफी व्यवसायात कसा आला राज कुंद्रा  

एकूण पाच लाख शेअर्सपैकी 2.57 लाख शेअर्स दोघांना देण्यात आले. दोघांनाही कंपनीचे 1.28 लाख - 1.28 लाख प्राधान्य समभाग देण्यात आले. त्यांना वियान इंडस्ट्रीजमध्ये 25.76-25.76 टक्के हिस्सा आणि एकूण 51.51 टक्के भागभांडवल मिळाले आहे.