पुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 

Updated: Jul 9, 2022, 12:47 PM IST
पुन्हा एकदा दे धक्का !  शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर title=

मुंबई : Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच 10 खासदारांची बैठक झाल्याची माहिती आहे. खासदार कृपाल तुमाणे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक झाली. काल झालेल्या या बैठकीला 10 खासदार उपस्थित होते. एवढंच नाही तर एक भाजपचा ज्येष्ठ नेताही या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदारांनी दिल्लीत डिनर डिप्लोमसी करत उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. 

शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला होता.  एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याकडे असणारे लोकसभेतील प्रतोद पद काढून घेतले. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना सावध झाली आहे. तसेच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्यासोबत आहेत.

शिवसेनेकडून आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत राजन विचारे (Rajan Vichare) यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी (Bhavana Gawli) यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवून दिलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, ते एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना शिवसेनेकडून (Shivsena) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली असून आता आढळराव पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या वृत्ताने अस्वस्थ झालेले आढळराव-पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले आहे. या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील भेटीसाठी बोलावलं होतं आणि या भेटीत आढळराव पाटील यांना ही ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.