आताची मोठी बातमी! आता खोके सरकार म्हटलं तर... शिंदे गट आक्रमक

Maharashtra Politics शिंदे गटावर 50 खोके असा आरोप करणाऱ्यांना आता... शिंदे गटाने घेतला हा मोठा निर्णय

Updated: Nov 8, 2022, 06:53 PM IST
आताची मोठी बातमी! आता खोके सरकार म्हटलं तर... शिंदे गट आक्रमक title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. खोके सरकार म्हणणाऱ्यांविरोधात शिंदे गटाने (Shinde Group) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. खोक सरकार म्हणणाऱ्यांना आता मानहानीची नोटीस (Notice of Defamation) पाठवली जाणार आहे.  पन्नास खोके आरोपांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे शिंदे गट आता कायदेशीर लढाई (Legal Battle) लढणार आहे. शिंदे गटाच्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी ही माहिती दिली आहे. 

सकाळ संध्याकाळ पन्नान खोक्यावरुन आरोप होत आहे. हे कुठे तरी थांबाव यासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांबरोबर याबाबत चर्चा झाली. आता आम्ही कायदेशीर लढण्याचा निर्मय घेतला आहे. आरोप होत असल्यामुळे लोकांमध्येही चर्चा आहे अशी माहिती शिवतारे यांनी दिली आहे. शिंदे गटाने विजय शिवतारे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. 

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 50 खोक्यांवरुन आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं आवाहन करत माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकू असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. 

पुरावे नसताना आरोप केले जात आहेत, त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जी शिवराळ भाषा वापरली ती रिअॅक्शन होती, आता मानहानीच्या केसला सामोरे जा किंवा माफी मागा असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. पण भाजपसोबत जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय.