शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा

Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde )  वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.  गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत. 

Updated: Dec 2, 2022, 03:20 PM IST
शिंदेंच्या बंडाची  तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा title=

Maharashtra Political News : महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव घेत अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने आदर्श अस म्हंटल होत. त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलेच राजकारण पेटले. हा वाद घुसमत असतानाच कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी देखील छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेशी मुख्यमंत्री शिंदेंची तुलना केली. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Shinde group MLA Sanjay Gaikwad ) यांनी देखील वाद आणखी वाढवणारे वक्तव्य केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.  गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे जे काही दौरे करता आहेत त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. जे काही ते दौरे करत आहेत इतिहासात पहिल्यांदा पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. मतदानातून जनता दाखवून देईल ते कुणा सोबत आहेत. हे सरकार शिवरायांच्या आदर्शावर चालणारे आहे. ज्यांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही असेच लोक असे वक्तव्य करतात आणि नंतर माफी ही मागतात अशी विधान त्या लोकांनी करू नयेत.

एकनाथ शिंदे हे काही बेईमान व्यक्ती नाहीत.  प्रसंगी शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी काव्याचा वापर केला आणि तोच कावा एकनाथ शिंदे यांनी वापरला आहे. ज्यांनी काही वक्तव्य केली आहे त्यांना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी समज दिलेली आहे यापुढे ते अशा प्रकारची वक्तव्ये करणार नाहीत.

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा

शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी. बाहेर पडून ते हिंदुत्ववाचे रक्षण करत आहेत, असे विधान लोढा यांनी केले आहे. विशेष म्हणजे प्रतापगडावर (Pratapgad) शिवप्रतादिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमातच त्यांनी हे वक्तव्य केले.

संजय राऊतांची टीका

दरम्यान, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. खोके सरकार आणि राज्यपाल ह्यांच्यात कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू असल्याचं त्यांनी म्हटल आहे. शिवरायांची तुलना बंडखोरांशी कशी करता?, छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्त्वाचा अपमान नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. तर, मंगलप्रभात लोढांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.