शिंदे गटाच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह आज ठरणार ? शिंदे गटाकडून बैठकांचे सत्र

CM एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज महत्त्वाची बैठक होत असून यामध्ये चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेतला जावू शकतो.

Updated: Oct 9, 2022, 06:55 PM IST
शिंदे गटाच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह आज ठरणार ? शिंदे गटाकडून बैठकांचे सत्र title=

मेघा कुचिक, मुंबई : उद्धव ठाकरे गटानंतर (Uddhav Thackeray Group) आता एकनाथ शिंदे गटालाही (Eknath Shinde Group) पक्ष नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला (Election commission) पर्याय द्यावा लागणार आहे. यासाठी वर्षावर आज बैठकांचं सत्र सुरू आहे. आज वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री, उदय सामंत, दिपक केसरकर, शीतल म्हात्रे यांच्या उपस्थितीत कायदेतज्ञ टीम समवेत बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट मंत्री नारायण राणेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गट उमेदवार देणार ?

आज संध्याकाळी 7 वाजता वर्षावर अजून एक बैठक पार पडणार आहे. पक्ष नाव आणि चिन्ह याबाबत कोणकोणते पर्याय द्यायचे याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri by-election) उमेदवार द्यायचा का याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.

दरम्यान दसरा मेळाव्यात भली मोठी तलवार व्यासपीठाजवळ ठेवली होती. त्यामुळे शिंदे गट धनुष्यबाण गोठवल्यास तलवार या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार अशी एक चर्चा आहे.

ठाकरे गटाने काय पर्याय दिले?

उद्धव ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा टीम नावांचा पर्याय दिला आहे.