शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की प्रकरण काय?

महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांवर नेहमीच हल्लाबोल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

Updated: May 30, 2022, 09:28 PM IST
शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की प्रकरण काय?  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांवर नेहमीच हल्लाबोल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आली आहे. शिवसैनिकांनी ही तक्रार देताना सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (shiv sainik give complaint against bjp leader kirit somaiya due to he use abusiveness word for cm uddhav thackeray at mulund)

तक्रार अर्जात काय म्हटलंय?

शिवसैनिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमय्या यांनी यांनी  27 मे रोजी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचा 'लुच्चा मुख्यमंत्री' असा उल्लेख केला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या विरोधात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

"सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांसाठी अपशब्द वापरुन राज्यातील जनतेच्या भावनांचा अनादर केलाय. त्यामुळे आम्ही सोमय्या यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. तसेच या विधानाबाबर सोमय्या यांच्यावर कायेदशीर कारवाई करण्यात यावी", अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाते, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष असणार आहे.