मोठी बातमी : मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला

अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसैनिक आक्रमक   

Updated: Aug 2, 2021, 04:07 PM IST
मोठी बातमी :  मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला

मुंबई : शिवसैनिकांची मुंबई विमानतळाच्या गेटवर तोडफोड केली आहे. अदानी एअरपोर्ट नाव असलेला बोर्ड शिवसेनेनं तोडला आहे. अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसेना आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी अदानी एअरपोर्ट लावला असल्याचं लक्षात येताचं शिवसैनिकांना बोर्ड तोडला. 

शिवसैनिकांनी याठिकाणा घोषणाबाजी देखील केली. या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं आहे, तर मग अदानी यांच्या फलकाची गरज काय? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

आज सकाळपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहे आहेत. मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे. तिथे महाराजांचं नाव असंल पाहिजे. याठिकाणी अदानी एअरपोर्ट असं नाव दिलं आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ते तोडलं आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.