आदित्य ठाकरे यांचा भाजपला जोरदार टोला

भाजपने शिवसेनेला (shiv sena) टार्गेट करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, आता शिवसेनाही आक्रमक होत आहे. 

Updated: Dec 27, 2019, 03:14 PM IST
आदित्य ठाकरे यांचा भाजपला जोरदार टोला title=

मुंबई : शिवसेनेसोबतची (shiv sena)  युती तुटली आणि त्यानंतर शिवसेनेची राज्यात सत्ता आली. सत्ता स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपने (BJP)  शिवसेनेला टार्गेट करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, आता शिवसेनाही आक्रमक होताना दिसत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधकांना सध्या काम नाही. त्यामुळे त्यांचा सोशल मीडियावर जास्त वेळ खर्च होत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. तशी टीका करण्याचे काम सध्या भाजपकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस टीका करत असाताना त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस मागे नाहीत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे आडनाव असले म्हणजे कोणी 'ठाकरे' होत नाही, असा टोला लगावला होता. त्यानंतर शिवसेना महिला आघाडीही आक्रमक झाली. तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. आता युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या सोशल मीडिया वॉर सुरु झाले आहे. तसेच भाजप नेत्यांकडूनही सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे सरकारला निशाण्यावर घेतले जाते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे. या टिकेनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद क्षमण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.