Sheetal Mhatre : 'शीतल तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत...' यामागचा करविता धनी कोण? चित्रा वाघ यांचा सवाल

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हिडिओचा मुद्दा आज विधानसभेतही उपस्थित केला गेला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, पण याागच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाने केली आहे.

Updated: Mar 13, 2023, 02:44 PM IST
Sheetal Mhatre : 'शीतल तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत...' यामागचा करविता धनी कोण? चित्रा वाघ यांचा सवाल title=

Sheetal Mhatre : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या (Sheetal Mhatre) मॉर्फिंग केलेल्या व्हायरल क्लिपचा (Viral Video Clip) मुद्दा आज विधानसभेतही गाजला. एका महिलेला मॉर्फिंग क्लिपवर (Morphing) किती खुलासे करावे लागणार असा सवाल शिवसेना आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी विचारला. तर संध्याकाळपर्यंत ही मॉर्फिंग क्लिप सोशल मीडियात (Social Media) फिरवणारा मास्टरमाईंड (MasterMind) शोधून काढा अशी मागणी भाजप आमदार मनिषा चौधरींनी (Manisha Choudhari) केली.

तर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही ट्विट करत शीतल म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत शीतल... तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत असं म्हटलंय. तसंच हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

काय म्हटलंय चित्रा वाघ यांनी?
राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो, हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे. पण आता विकृतीने कळस गाठला आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्ह्ययरल होत आहे. एखाद्या बाईला थांबवू शकत नाही, मग तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, अशा पद्धतीचे विकृती व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एका शीतल म्हात्रेचा नाहीए, शीतल सारख्या हजारो महिला राजकारणात काम करतात. आज तिचा नंबर आहे, उद्या आमचा नंबर असले, त्यामुळे हा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पण याचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. यामागे असलेल्या सूत्रधाराला शोधून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.

काय आहे नेमकं प्रकरण?
मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) आणि  शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवारी श्रीकृष्ण नगर या ठिकाणी नदीवरील पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे हे देखील होते.  त्यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ठाकरे गटाने (Thackeray Group) चुकीच्या पद्धतीने तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर संतापलेल्या शीतल म्हात्रे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाणे (dahisar police) गाठत तक्रार दाखल केली.