शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?, उद्धव-पवार यांची गुप्त भेट

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. 

Updated: Nov 7, 2017, 03:59 PM IST
शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?, उद्धव-पवार यांची गुप्त भेट title=

दीपक भातुसे/ मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

- उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वी शरद पवारांची घेतली भेट
- शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतली भेट
- राज्यातील सद्य स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी घेतली भेट
- तुम्ही तुमची भूमिका घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल
- शरद पवारांनी उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली
- उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही