मुंबई : Shiv Sena's Bunty Bubli ambulance : खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी अॅम्बूलन्स तैनात केलीय. यावर 'बंटी-बबली'साठी राखीव असे पोस्टरही चिकटवलेत. शिवसेना स्टाईल दोघानांही महाप्रसाद दिल्यास त्यांना या अॅम्बूलन्समधून थेट अमरावतीला मोफत सेवा देणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे, युवा सेना कोअर कमिटी सदस्य राहुल कनाल यांनी सांगितले. (Shiv Sena's Bunty Bubli ambulance at Navneet Rana House in Khar Mumbai) दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी शिवसेनेने दोन स्ट्रेचर आणली आहेत.
खार इथल्या राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्या वतीनं राणा दाम्पत्यासाठी अॅम्बूलन्स तैनात केली आहे. यावर बंटी बबलीसाठी राखीव असं पोस्टरही चिकटवलंय. जर राणा दाम्पत्य बाहेर पडलं तर शिवसेना स्टाईल दोघानांही महाप्रसाद देणार आणि मग त्यांना या अॅम्बूलन्समधून थेट अमरावतीला मोफत सेवा देणार असल्याचे शिवसैनिकांनी यावेळी सांगितले.
हनुमान चालीसा पठणावरुन राणा दाम्पत्य आणि शिवसेना आमने-सामने (Navneet Rana vs Shivsena ) आले आहेत. मुंबईत जोरदार राडा पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यांना मातोश्रीकडे जाण्यापासून शिवसैनिकांनी रोखले आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी घरातूनच फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला. एका आमदार आणि खासदाराला घरात बंद केले त्याचे कारण काय?, आम्हाला बंद केले पण इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक बाहेर आले त्यांना का रोखले नाही. बॅरिकेडिंग तोडून गेटच्या आत येण्यापर्यंत त्यांना कोणी ताकद दिली, आदी सवाल उपस्थित केले आहेत.
राणा दाम्पत्याने अमरावतीत पोलिसांना गुंगारा देत विमानाने मुंबई गाठली. मुंबईतील खारमधील आपल्या निवासस्थानी 22 एप्रिल 2020 रोजी दाखल झाले. ही माहिती मिळतात शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर खडा पाहारा दिला. रात्र जागून काढली. त्यांना घराबाहेर पडण्यास अटकाव केला. मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणाला शिवसैनिकांनी प्रचंड विरोध आहे.