राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन

मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. सामना कार्यालय ते शिवसेना भवन ही बाईक रॅली काढण्यात आली. 

Updated: Jun 26, 2022, 11:57 AM IST
राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन title=

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता सत्तासंघर्ष वाढला आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे असा वाद सुरू झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी आता उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनं केली आहेत. 

मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. सामना कार्यालय ते शिवसेना भवन ही बाईक रॅली काढण्यात आली. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज मुंबईत आदित्य ठाकरे आज मेळावा घेणार आहेत. 

शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातला संभ्रम दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आजच्या घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान विविध ठिकाणी रॅली काढल्या जात आहेत. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे दोन गट आणि दोन्ही गटांचे समर्थक शक्तीप्रदर्शन करत आहेत. 

आदित्य ठाकरे यांचा इशारा
विधानभवनाकडे जाणारे रस्ते वरळी, वांद्रे, परळ, भायखळ्यातून जातात, हे लक्षात ठेवा अशा शब्दात शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना इशारा दिलाय. मुंबई एअरपोर्टवर उतराल तेव्हा लक्षात ठेवा, मग केंद्राने भले आर्मी लावावी किंवा CRPF असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय. आपल्या वक्तव्यातून आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना थेट आव्हानच दिलंय.