मुंबई : प्रादेशिक पक्षाला एका आघाडीत जावं लागतं. स्वतंत्र लढून नंतर काँग्रेसच्या गोटात जाणं शक्य नव्हतं म्हणून भाजपासोबत आहोत. काँग्रेसला ५० वर्षे दिली, आता आणखी ५ वर्षे भाजपला देवून बघुयात असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. भविष्यात निश्चित दिशेने पुढं जायचंय. येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेनेच्या विजयासाठी काम करायचंय असल्याचं ते यावेळी म्हणाले.
युती करण्यामागणी कारणं ठाम आहेत. जेव्हा सगळे तुमच्या बाजुने होते तेव्हा तुमच्यासमोर जनतेच्या न्यायहक्कासाठी एकमेव शिवसेना होती. आज २०१४ सारखं वातावरण नाही. आज सगळे तुमच्या विरोधात गेल्यानंतरही जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. देशात राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षासोबत जात आहेत. उद्या वेगळे लढलो असतो आणि बहुमत कोणालाच नसतं तर काँग्रेसकडे जाता आलं नसतं. काँग्रेसकडे दुर्दैवाने देश गेला असता तर हिंदुत्व आणि इतर गोष्टीही मागे गेल्या असत्या. मी माझा पक्ष बरोबर पुढे नेईल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पाहा काय बोलले उद्धव ठाकरे