मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात बोलताना भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आवाजात जडपणा होता. इतके वर्ष काम केल्यानंतर आज मुख्यमंत्रीपदा येऊन बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते ते भावुक झाले होते.
''मी मुख्यमंत्री झाले यावर माझा विश्वास बसत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे युतीचं सरकार आलं आहे. मतदानादिवशी जी मला वागणूक मिळाली, आमच्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इथे बसलेले आमदार आहेत.
मला काय झालं माहिती नाही. पण मला बाळेसाहेबांनी सांगितलं होतं की अन्यायाविरुद्ध बंड करायला हवं. त्यावेळी माझ्या डोक्यात काय आलं माहिती नाही. पण मी चाललो.
मी काहीही लपवू इच्छित नाही. माझ्यासोबत आलेल्या आमदारांनी माझ्यासोबत विश्वास दाखवला. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल.
मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही. कुटुंबाआधी शिवसेनेला वेळ दिला.
अपघातात गमावलेल्या दोन मुलांच्या आठवणीनं एकनाथ शिंदे भावूक झाले. शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं. माझी दोन मुलं मी गमावली तेव्हा खचून गेलो होतो. आनंद दिघेंनी मला पुन्हा उभं केलं. मी खूप मेहनत केली. दिघेंमुळे पुन्हा शिवसेनेसाठी सारंकाही झुगारुन काम करू लागलो. शिवसेनेला कुटुंब मानलं आणि आज माझा बाप काढला जातो.
30-35 वर्ष जिवाचं रान केलं पण कोणी रेडा म्हणाला कोणी प्रेतं म्हणाले कोणी पोस्टमार्टम केलं कोण वेश्या म्हणालं आम्ही एकही शब्द काढला नाही. जेव्हा अन्याय होतो तेव्हा मी सहन करत नाही. मी कधीच पदाची ललसा केली नाही.
आपण पाहिलं तर विरोधी पक्षातून सत्तेकडे जायची वाटचाल असते. मात्र आज आपण ऐतिहासिक घटना पाहत आहे. मला फडणवीस म्हणाले फक्त देश नाही तर तेहत्तीस देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
सत्तेतून, मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री याठिकाणी आहेत. हे सर्व मंत्रीपद डावावर लावून चालीस आमदार आणखी दहा आमदार पन्नास आमदार, एकीकडे बलाड्य असं सरकार, सरकारममध्ये बसलेली मोठी माणसं एकिकडे आणि दुसरी बाळासाहेबांचे शिवसैनिक.
एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक होते.''