धक्कादायक! एकाच कुटुंबात आढळले चौघांचे मृतदेह

मृतांमध्ये दोन लहान मुलं पती आणि पत्नीचा समावेश 

Updated: Feb 22, 2020, 04:07 PM IST
धक्कादायक! एकाच कुटुंबात आढळले चौघांचे मृतदेह

नवी मुंबई : नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ मध्ये एका घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्व मृतदेह उपाध्याय कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलं पती आणि पत्नीचा समावेश आहे. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होतं. 

पत्नी आणि दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वी या हत्या आणि आत्महत्या झाल्या होत्या. तीन महिन्याचं थकीत घरभाडं घेण्यासाठी जेव्हा घरमालक गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.