श्रावणी सोमवार: मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.

Updated: Aug 13, 2018, 09:00 AM IST
श्रावणी सोमवार: मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी title=

मुंबई: पहिला श्रावणी सोमवार असल्याने शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केलीये. दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांनी बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी चांगलीच गर्दी केलीय.

व्रत वैकल्याचा महिना

श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना, सुंदर हिरवागार परिसर आणि धार्मिक पूजा पाठाचा उत्सव, या महिन्यात महादेवाचे भक्त महादेवाला उपास वारी करत भजत असतात. आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.

हर..हर..महादेवचा गजर

राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. त्र्यंबकेश्वरसह घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भिमाशंकर इथं भाविकांची रीघ लागलीय. हर..हर..महादेवचा गजर करत भाविक दर्शन घेताहेत.