मुंबई : कांदिवली-बोरिवली स्टेशनजवळ एक धक्कादायक अपघात झाला आहे. कांदिवली-बोरिवली स्टेशनजवळ रेल्वे रुळावर मालवाहू ट्रक आल्यामुळे जोरदार धडक झाल्यामुळे ही दुर्दैवी घडली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. ट्रकची मागील बाजू रेल्वे रूळावर आल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या लाइनचं काम सुरु होतं. याच दरम्यान बांद्रा टर्मिनस ते अमृतसर ट्रेनने ट्रकला धडकली.
Bandra Terminus-Amritsar train was stopped after a side collision with a truck at Kandivali-Borivali line in Mumbai. No injuries reported in the incident: Western Railway
— ANI (@ANI) July 20, 2020
पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी मालवाहू ट्रक त्याठिकाणी उभी होती. साधारण सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र ट्रकचं मोठ नुकसान झालं आहे. या अपघातामुळे रेल्वेसेवा मात्र विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता हा अपघाता नक्की कसा झाला याप्रकरणी पोलीस अधिक तपास गेत आहेत.