मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याने एकच खळबळ

ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये आढळला साप

Updated: Aug 2, 2018, 01:25 PM IST
मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याने एकच खळबळ

मुंबई : टिटवाळा येथून सीएसएमटीकडे लोकल जात असताना ठाणे येथे लोकलमध्ये पंख्यात साप असल्याचं प्रवाशांना दिसलं आणि एकच गोंधळ उडाला. काही काळ प्रवाशांचा थरकापच उडाला होता. प्रवाशांनी लाकडी पट्टीने सापाला पंख्यातून खाली पाडलं त्यानंतर लोकलमधून सापाला ट्रॅकवर टाकलं. त्यानंतर ही लोकल पुढे रवाना झाली. सकाळी 9 च्या दरम्यान ही घटना घडली.

टिटवाळ्यावरुन 8.33 ची ही लोकल जेव्हा ठाण्याला पोहोचली तेव्हा या सापाकडे प्रवाशांचं लक्ष गेलं. यामुळे काही काळ लोकल खोंळबली होती.