close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशी सुखरुप

विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला.

Updated: Oct 15, 2019, 10:15 PM IST
विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशी सुखरुप

विरार : विरार पूर्वेकडील कोपरी भागातील नित्यानंद धाम या अनधिकृत इमारतीचा काही भाग रात्री कोसळला. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा आणि टेरेसचा काही भाग रात्री ८ वाजताच्या सुमारास कोसळला. दुर्घटना घडली तेव्हा अनेक रहिवाशी आणि लहान मुलं इमारतीत अडकली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या रहिवाशांना आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

या निमित्ताने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.