बातमी तुमच्या कामाची : 'शिवशाही'त ज्येष्ठांना खास सवलत

राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रमाणे 'शिवशाही' बसमध्ये खास सवलत 

सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2018, 08:22 AM IST
बातमी तुमच्या कामाची : 'शिवशाही'त ज्येष्ठांना खास सवलत title=

मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रमाणे 'शिवशाही' बसमध्ये खास सवलत मिळणार आहे. ही सवलत १ जूनपासून लागू होणार आहे. सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरू झालेल्या 'शिवशाही' बस मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान, ही सवलत थोडी कमी करण्यात आलेय. ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसेसमध्येसुद्धा सवलत मिळावी अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रावते यांच्याकडे केली होती. याची दखल घेत रावते यांनी घेतली आणि ही घोषणा केली.

एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या टाटा बनावटीच्या ५०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील एकूण ७०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश महामंडळाच्या वाहन ताफ्यात होणार आहे. मात्र सध्या ३५० शिवशाही बसेसचा समावेश आहे.

वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्यात येईल. १ जून २०१८ पासून म्हणजे एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू होणार आहे. याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती एसटी प्रसासनाकडून देण्या आलेय.