आनंद हा तुझा हक्क आहे, स्पृहा जोशीने शेअर केली भावनिक पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट 

Updated: Dec 3, 2020, 05:19 PM IST
आनंद हा तुझा हक्क आहे, स्पृहा जोशीने शेअर केली भावनिक पोस्ट  title=

मुंबई : सामाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. डॉ. शीतल आमटे यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळेच साऱ्यांना धक्का बसला आहे. मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने यावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. स्पृहाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचा उल्लेख केला आहे. आनंद हा तुझा हक्क आहे. मी म्हणतेय ते खऱ्या आनंदाबद्दल. ज्या आनंदामुळे तुझं संपूर्ण हृदय आनंदमय होईल. 

हे आपल्या सर्वांसाठी आहे .. तिथेच लोक अडकले .. एके दिवशी .. आमटेशीटलच्या दु: खाच्या निधनाने मला आजूबाजूच्या सर्व गोष्टींकडे संपूर्ण नवीन दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पाडले आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. शीतल यांचा मृतदेह सोमवारी बाबा आमटे यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आला. या घटनेबद्दल आमटे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

डॉ. शीतल यांचे पार्थिव काल संध्याकाळी आनंदवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. आमटे कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे करजगी कुटुंबिय देखील उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही तिथं गर्दी केली होती.

वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे (Digant Amte) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'हे फारच धक्कादायक आहे. आम्ही याची कल्पना काहीच केली नव्हती. आम्ही आता सगळे शॉकमध्ये आहोत. प्रतिक्रिया देण्यासारखं काही राहिलंच नाही. आम्ही सगळे धक्यात आहोत,' अशी प्रतिक्रिया डॉ. दिगंत प्रकाश आमटेंनी दिली आहे.