Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली.
आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याने यांचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकरवर कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं असल्याची प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
गेले पाच महिने हा लढा एसटी कर्मचाऱ्यांन सुरु केलेला होता. सरकारने सुरुवातीचा काळात ठोस भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात नाराजी आहे असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटलं आहे.
एसटी कामगार संघटना जी होती, ती शरद पवार यांची होती, त्या संघटनेने फसवणूक केली ही भावना एसटी कामगारांच्या मनात होती. कामगारांच्या वार्षिक अधिवेशनात भविष्यकाळात एसटी कामगारांचं शासनात विलिनीकरण करु अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आमचं सरकार जर आलं तर एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण करु असं सांगण्यात आलं होतं. यातून एकच धडा घेतला पाहिजे, भविष्यात राजकारणी लोकांनी आपल्याला झेपेल तेच बोलावं, खोटी आश्वासनं देण्याचा काळ आता संपलेला आहे असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
एखादं आंदोलन परिपक्व नसेल तर ते कसं भरकटतं, हे आताच्या आंदोलनावरुन दिसतंय, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.