'म्हणून संजय दत्तची शिक्षा कमी केली'

अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिलेत.

Updated: Jul 17, 2017, 06:03 PM IST
'म्हणून संजय दत्तची शिक्षा कमी केली' title=

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिलेत. संजय दत्त जेल मध्ये असताना त्याला ५ दिवस फर्लो/पॅरोल व्यतिरिक्त अतिरिक्त सुट्टी घेतली होती. यात कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झालं नसून संजय दत्तला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत, तसंच त्याच्या चांगल्या वर्तवणूकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती, असं राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे स्पष्ट केलय. 

पण राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध करत राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.