सर्वांसाठी लोकल सुरु करा; सरकारसह नागरिकही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

पाहा काय आहेत लक्षपूर्वक वाचण्याजोग्या गोष्टी....   

Updated: Oct 28, 2020, 07:23 PM IST
सर्वांसाठी लोकल सुरु करा; सरकारसह नागरिकही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरच्या पार्वभूमीवर जवळपास सात महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणाऱी लोकल सेवा अत्य़ावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र अद्यापही ही रेल्वे सेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. पण, आता मात्र त्यासाठी वेगानं हालचाली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सध्याच्या घडीला एकंदर परिस्थिती पाहता, राज्य सरकारने रेल्वेला सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. या विनंती मध्ये कोणी कधी प्रवास करावा याबाबत सूचना केल्या गेल्या आहेत. आता रेल्वेकडून येणाऱ्या निर्णयाची शासनासोबतच नागरिकांनाही प्रतीक्षा लागली आहे. 

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला राज्य सरकारचं पत्र प्राप्त झालं असून याचा सकारात्मक पध्दतीनं अभ्यास करून पुढे यावर कशा पध्दतीनं कार्यवाही करता याचा आढावा घेतला जात आहे. .

रेल्वेला उद्देशून करण्यात आलेल्या या पत्रातून गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकं आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाच्या वेळा वेगळ्या ठेवण्याची सूचना राज्य सरकारक़डून करण्यात आली आहे. 

पत्रातील सुचनांमध्ये नेमकं काय...

- सकाळी 7.30 पर्यंत सर्वांसाठी लोकल सुरु करा 
- दुपारी 11 ते 4.30, रात्री 8 नंतर लोकलप्रवास 
- अत्यावश्यक सेवांमधील प्रवाशांसाठी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रवास 
- तिकीट असलेल्या सर्वांना सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत प्रवासाची मुभा. 
- दर तासाला एक लेडीज स्पेशल लोकल