Maharashtra News : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे थोडक्यात बचावले. रायगड जिल्ह्यातील मांडवा ते मुंबईतील गेट वे ॲाफ इंडिया (Mandwa to Gateway of India) स्पीड बोटीने (Speed Boat) प्रवास करत असताना भर समुद्रातच स्पीड बोट बंद पडली. स्पीड बोटीची सर्वच यंत्रणा बंद पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बोटीवरची यंत्रणा बंद पडल्याने बोटीच्या कॅप्टनला मदतीसाठी आपत्कालीन संदेशही (Emergency Messages) सुरक्षा यंत्रणांना पाठवणं अशक्य झालं होतं. अशा कठिण परिस्थितीत प्रसंगावधान राखत उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने तात्काळ दुसरी स्पीड बोट मागवून घेतली.
उद्योग मंत्री उदय सामंत अलिबाग ते मुंबई (Alibaug to Mumbai) असा प्रवास स्पीड बोटीने करत होते. समुद्रात प्रवासादरम्यान त्यांच्या स्पीड बोटीचं इंजिन बंद पडलं. समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली. बंद पडलेल्या स्पीड बोटीच्या सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठिण झालं.
भर समुद्रात अशा संकट प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट मागवली. दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चालेल्या स्पीड बोटीला दूसऱ्या बोटीने भर समुद्रात बचाव कार्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना सुखरूप परत आणलं. उद्योग मंत्री उदय सामंत हे आता मुंबईत सुखरूप परतले आहेत.
हे ही वाचा : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल
डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात
आज सकाळीच माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak SawantP यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाला. डंपरनं दीपक सावंत यांच्या कारला धडक दिली. डॉ. दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातात सावंत यांच्या मानेला आणि पाठिला दुखापत झाली असून त्यांच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे. डॉ. सावंत यांना अॅब्युलन्सने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.