मुंबई : दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतरही राजकारण केले जातंय. भाजप नेत्यांकडून महिलांचे सतत हनन होत आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावी. भाजपच्या महिला (चिवा) यांनीही एक महिला म्हणून यात लक्ष घालावं. कुणाच्या मृत्यूनंतर बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
गेले काही दिवस भाजप नेते किरीट सोमैया आणि नारायण राणे हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताहेत. आज शिवसेनाभवन येथे खासदरा विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर पेडणेकर यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
दिशा सलीयनबद्दल काढलेले उदगार व्यथित करणारे आहेत. तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टला खोटं ठरविण्याचं काम ते करत आहेत. तिच्या चारित्र्याचं हणन होतंय. एका मुलीचा मृत्यू झालाय मात्र तिची बदनामी चालली आहे. तिच्या कुटुंबियांनी वारंवार सांगूनही ते महिलांच्या इज्जतीला किंमत देत नाहीत. यामुळे आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
अन्वय नाईक याचे कुटुंबीय टाहो फोडून न्याय मागत आहेत. त्यावेळी त्यांना न्याय देता आला नाही. पण, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत. ज्या सीबीआयकडे ही केस देण्यात आली होती. त्याचे काय झालं? आमची उत्सुकता वाढत असून ते उघडे केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कुणालाही अंगावर यायच असेल तर या, असं आव्हानही त्यांनी दिलं.