मुंबई : गेले दोन दिवस भारतीय आणि जागतिक बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहेत. भारतीय बाजारात गेल्या दोन दिवसात साधारण आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९६ अंकांनी तर सेन्सेक्स पुन्हा एकदा ३०० अंकांनी कोसळला. त्यामुळे उद्या शेअर बाजारात काय स्थिती असेल, याची उत्सुकता लागली आहे.
जागातिक बाजारामध्ये पडझडीचं सगळ्यात मोठे कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. तिकडे सोन्या चांदीच्या बाजारातही आज पुन्हा एकदा घसरण झाली. कालची वायदा बाजारात झालेली घसरण आज सराफा बाजारात बघयाला मिळाली. आधी पितृपक्षामुळे सराफा बाजारात उठाव नाही. त्यात आता चढ्या भावानं खरेदीला ब्रेक लागले आहेत. तसेच मंगळवारी दुसर्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली.
जागतिक बाजारातील खराब परिस्थितीत वाहन आणि बँकिंग समभागांचे नुकसान झाले. प्रमुख तोटा मारुती, एलटी, इंडस्इंड बँक, अॅक्सिस बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आरआयएल, एशियन पेंट, कोटक बँक, नेस्ले, टायटन आणि एचडीएफसी बँक (Maruti, LT, IndusInd Bank, Axis Bank, ONGC, HDFC RIL, Asian Paint, Kotak Bank, Nestle, Titan and HDFC Bank) यांना बसला. सेंसेक्स पॅक २.८३ टक्क्यांपर्यंत घसरला. तर एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि एसबीआय यांचे शेअर्स २.४३ टक्क्यांनी वधारले.
गेल्या दोन तीन दिवसात सोन्याचा भाव साधारण २ हजार रुपयांनी खाली आला आहे. त्यामुळे दसरा दिवाळीआधी सोन्याचा भाव आणखी थोडाफार खाली उतरले अशी ग्राहकांना आशा आहे. जागतिक बाजारात प्रमुख्यानं अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं येत्या काळात गुंतवणूकदारांच्या हृदयाचे ठोके चुकवणारे दिवस आणखी बघायला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.